Saturday, 25 July 2015

ती अविस्मरणीय रम्य सकाळ


 
स्वित्झर्लंडला  भेट देण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. प्रवास रात्रीचा  असल्याने विमानामध्ये कधी झोप लागून गेली ते कळलेच नाही. सकाळी .३० वाजता जेव्हा डोळे उघडले माझी नजर थेट खिडकीतून बाहेर गेली. बाहेर मस्त उजेड पडला होता खाली दूर दूरवर पसरलेले बर्फाच्छादित डोंगर पाहून मन अगदी दिपून गेले. काही ठिकाणी अगदी लहान आकाराची घरे आणि आजूबाजूला असणारा बर्फ आणि झाडे पाहून अगदी स्वप्नात असल्याप्रमाणे भासत होते. इतका सुंदर अन रम्य देखावा पाहून अगदी प्रसन्न वाटत होते. सगळ्या चिंता आणि थकवा सगळ काही गायब झाल होत.

खरंच ती एक अविस्मरणीय सुंदर सकाळ होती. स्विझर्लंडला बरेच लोक "स्वप्नाविश्व" या नावाने का संबोधत असावेत याचा उलगडा फक्त त्या एकाच दृश्याने करून दिला होता. देवाने सगळी नैसर्गिक सौंदर्याची देणगी या रम्य ठिकाणाला दिल्याप्रमाणे वाटत होते.  

No comments:

Post a Comment